अक्कलकुवा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरा ; मिळवणुकीने वेधले लक्ष

Social 4 weeks ago 5050

Share News with your Friends

हिंदवी स्वराज्याचे जनक श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती तिथि नुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त दि. 28 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अक्कलकुवा शहारातून श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सवाद्य भव्य मिरवणूक मोठया जल्लोषात काढण्यात आली. शहरातील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे विधान परिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा अर्चा पुष्पमाला वाहुन अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, शेतकरी संघाचे चेयरमेन पृथ्वीसिंग पाडवी, मगन वसावे,, मा सरपंच राजेन्द्र वसावे, विनोद वळवी, अश्विन वळवी, कान्हा नाईक, अशोक पाडवी, अमरसिंग वसावे, रविंद्र चौधरी, किरण चौधरी, मनोज डागा, मनोज सोनार, किरण भावसार, मा. जि.प.सदस्य कपिल चौधरी, डिंपल चौधरी, रोहित चौधरी, रवींद्र चंदेल, तापसिंग वसावे, भीकमचंद चव्हाण, रामु सोलंकी, प्रकाश खिंची, रोहित सोनार, गोलू चंदेल, दीपक मराठे, भटू बोरा, सह सर्व शिव प्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमा नंतर सजविलेल्या ट्रॅक्टर वर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अक्कलकुवा शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिळवणुकीतील आकर्षक सजावट, विद्युत रोशनाई, ढोल ताशाचा गजर तसेच बँड च्या तालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर मिरवणुकीचे आयोजन आमदार आमश्या पाडवी, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांनी केले.

Tags Social TrendingTrendingTrendingTrending

Share News with your Friends

Related News

banner

Report By

Shubham Bhansali

Comments
banner

24 Jul 2020

Chigusa Kisa

Praesent facilisis vulputate venenatis. In facilisis placerat arcu, in tempor neque aliquet quis. Integer lacinia in ligula eu sodales. Proin non lorem iaculis, dictum lorem quis, bibendum leo.

banner

24 Jul 2020

Mohsen Salehi

Lucy Miller

Praesent facilisis vulputate venenatis. In facilisis placerat arcu, in tempor neque aliquet quis. Integer lacinia in ligula eu sodales. Proin non lorem iaculis, dictum lorem quis, bibendum leo.